सुधार समिती अध्यक्षपदी अनंत (बाळा) नर तर बेस्ट समिती अध्यक्षपदी अनिल कोकिळ बिन विरोध

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या सुधार व बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनुक्रमे अनंत (बाळा नर) व अनिल कोकीळ यांनी अर्ज भरला आहे. प्रतिस्पर्धी एकही अर्ज न आल्याने ही बिनविरोध निवड होणार आहे. येत्या गुरुवारी 16 मार्चच्या समिती सभेत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

पालिकेच्या सर्व समितींच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. स्थायी व शिक्षण समिती अध्यक्ष पदाच्या निवडणूका पार पडल्यानंतर मंगळवारी सुधार व बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतीम मुदत होती. शिवसेनेकडून अनंत (बाळा) नर यांनी सुधार समिती अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. तर बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी अनिल कोकिळ यांनी अर्ज भरला. काँग्रेसकडून अर्ज दाखल न झाल्याने या दोघांचाही बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता फक्त अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. अनंत (बाळा) नर यांची महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याची दुसरी टर्म आहे. पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 77 मधून ते 12 हजार 854 मतांनी निवडून आले. यापूर्वी त्यांनी स्थापत्य (उपनगर) अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ते स्थायी समितीवर सदस्यही होते.तर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 204 मधून प्रथमच 13 हजार 410 मतांनी निवडून आलेले शिवसेनेचे अनिल कोकिळ यांनी बेस्ट समिती अध्यक्ष पदाचा अर्ज भरला. प्रतिस्पर्धी कोणाचा अर्ज आलेला नसल्याने त्यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकऴा झाला आहे. आता फक्त औपचारिकता बाकी असून ते अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले, याची अधिकृत घोषणा 16 मार्चला होणार आहे. कोकिळ यांनी बेस्टमध्ये 36 वर्ष नोकरी केली आहे. त्यांचे वडीलही या सेवेत होते. निवृत झाल्यानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली, व ते निवडूनही आले. आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या बेस्टला सावरण्यासाठी ते काय प्रयत्न करतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget