मुंबई पालिका महापौर पदासाठी शिवसेना -भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – - मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अवघे तीन ते चार दिवस बाकी राहिले आहेत शिवसेना- भाजपमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. सध्या भाजपपेक्षा शिवसेनेच्या जागा जास्त असल्या तरी हा आकडा पार करण्यासाठी भाजपने ही मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. यांत काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे महापौर पदाच्या चुरशीत सरशी कुणाची याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत
मुंबई महापौर पदाची निवडणूक येत्या 8 मार्चला होत आहे. अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेला पाच पैकी चार अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यात यश आल्याने त्यांच्या जागांची संख्या 88 झाली आहे. तर भाजपच्या गोठात पाचवा अपक्ष व अभासेच्या गीता गवळी दाखल झाल्याने भाजपची संख्या 84 वर पोहचली आहे. त्यामुळे सध्या तरी शिवसेनेच्या जागा जास्त असल्याने शिवसेनेचा महापौर होऊ शकतो, असे चित्र आहे. मात्र अजून चार दिवस शिल्लक असल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपचीही जोरदार रणनिती सुरू केली आहे. महापौर पदासाठी काँग्रेसही आपला उमेदवार उभा करणार असून, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी पुढे प्रस्ताव ठेवला असल्याचे काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. मनसेनेही उमेदवार उभा करण्याचे ठरवले आहे. काँग्रेस व मनसेने उमेदवार उभे केल्यास फायदा शिवसेनेलाच होणार आहे. मात्र अजूनही चार दिवस शिल्लक असून मनसे काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे. भाजपला संख्या गाठण्यासाठी पाच नगरसेवकांची आवश्यकता आहे. ऎनवेळी फोडाफोडीचे राजकारण झाल्यास समिकरण बदलू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुऴात आहे.

शिवसेना, भाजप, काँग्रेस व मनसेचे उमेदवार रिंगणात ---
महापौर पदाच्या रिंगणात शिवसेनेकडून मंगेश सातमकर यांना उतरवण्याची शक्यता आहे. तर भाजपने उमेदवार उतरवल्यास तो शेलार गटाचा नसेल अशी माहिती सूत्रांची आहे. काँग्रेस रवी राजा किंवा आशिफ झकेरिया यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर मनसेतर्फेही उमेदवार उभा केला जाणार आहे. काँग्रेस, मनसेने उमेदवार उभा केला तरी त्यांचे संख्याबळ पाहता ते स्पर्धेत नसतील. शिवसेना किंवा भाजप यापैकी कोणाच्या तरी उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी किंवा पाडण्यासाठी काँग्रेस, मनसेची उमेदवार उभे करण्यासाठीची औपचारिकता असणार आहे. 4 मार्चला उमेदवार अर्ज दाखल केला जाणार असून निवडणुकीच्या आधी एक तास अर्ज मागे घेता येणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget