मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – श्रीलंका स्काऊट असोसिएशन, कोलंबो या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने श्रीलंकेचे महामहीम राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांच्या हस्ते भाप्रसे (निवृत्त) राज्य मुख्य आयुक्त तथा मुख्य राष्ट्रीय आयुक्त भा. ई. नगराळे यांचा नुकताच सिल्व्हर लायन हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.गत चार दशकांहून अधिक काळ भा. ई. नगराळे हे स्काऊट गाईड चळवळीत समर्पणाच्या भावनेने काम करीत आहेत. या चळवळीच्या प्रगतीसाठी भारतात व एशिया पॅसिफीक रिजनमध्ये नगराळे यांनी केलेल्या उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण कामामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यांच्या पुरस्काराबद्दल भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय संस्था, दिल्ली, राज्य संस्था, मुंबई, कर्मचारी, मित्र परिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.
Post a Comment