शिवाजी पार्कला सेल्फी पॉंईटचा वेढा - तिन्ही पक्षांना पालिकेची परवानगी

मुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी)- गजबजलेल्या दादर शिवाजी पार्कवरील सेल्फी पाँईट सुरू असलेल्या वादावर पालिकेने शुक्रवारी पडदा टाकला. प्रत्येक पक्षाने ५० फुटांच्या अंतरावर सेल्फी पॉईंट उभारा, अशी सुचना पालिका प्रशासनाने मनसे, शिवसेना आणि भाजप या राजकीय पक्षाना केली. त्यामुळे मनसेचा सेल्फी पॉईंट बंद करण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेच्याही पथ्यावर पडले आहे.
दादर येथील मनसेच्या बालेकिल्ल्यात मनसेचा पराभव झाल्याने नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या चांगला जिव्हारी लागला. यामुळे त्यांनी शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉईंट बंद करण्याची घोषणा केली. सेल्फीवरून यानंतर चांगलाच राजकारण तापले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपण सेल्फी पॉईंट आणखी आकर्षक करणार असल्याचे ट्विटरवरून मनसेला इशारा दिला. तर शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी नवीन कलाकृतीसह आपण सेल्फी पॉईंट सुशोभित करणार असल्याचे जागोजागी फलक लावले. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी तात्काळ दखल घेऊन सेल्फीपॉईंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत भाजपने आयुक्तांमार्फत सेल्फीपॉईंट बनविण्याची मिळवली. यावर मनसेने आक्षेप नोंदवत, मनसेचे सेल्फी पॉइंट अद्याप जागेवर असताना पालिकेने नव्याने परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिकेला विचारला. यावर बुचकळ्यात पडलेल्या जी-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दादरमधील सेल्फी पॉइंटच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मनसे, शिवसेना आणि भाजप या पक्षांची बैठक बोलावली. या बैठकीत तिन्ही पक्षांना सेल्फीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शिवाजी पार्क परिसराला यापुढे सेल्फी पॉंईटचा वेढा पडल्याचे पहायला मिळणार आहे. दरम्यान, पूर्वीच्याच जागेवर मनसेच्या सेल्फी पॉईंटसाठी जागा दिली असून इतर पक्षांना इतरत्र जागा दिल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

सेल्फीऐवजी, स्टडी पॉईंट उभारा
सेल्फी पॉईंटचा वाद रंगला असतानाच राष्ट्रवादीने यात उडी घेऊन मनसे, शिवसेना आणि भाजपवर राष्ट्रवादीने जोरदार टीका केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट नको तर शालेय अभ्यासक्रमाकरिता स्टडी रुम उभारा, अशा शब्दात या तिन्हीं पक्षांना काचपिचक्या दिल्या. तसेच स्टडी पॉईंटची सर्वप्रथम मागणी राष्ट्रवादीने केल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget