पालिकेची मॅटर्निटी होम अनेक सुविधांपासून वंचित

पालिका र-थायी समितीत पडसाद -
सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर - 
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेने लोकांच्या सेवेसाठी मॅटनिॅटी होम सुविधा सुरू केली मात्र त्याची व्यवस्था चोख पार पाडली जात नाही पालिकेच्या मॅटर्निटी होममधील असुविधांमुळे गरिब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. फक्त पदे भरून या असुविधा दूर होणार आहेत का असा सवाव विचारत नगरसेवकांनी विभागातील मॅटर्निटी होममधील असुविधांचा पाढा वाचून प्रशासनाला धारेवर धरले.याचे पडसाद पालिका र-थायी समितीत बुधवारी उमटले

मुंबई महापालिकेच्या मॅटर्निटी होमधील हंगामी पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. य़ावर शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी पालिकेच्या मॅटर्निटी होममधील असुविधांना रुग्णांना कसे सामोरे जावे लागते याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. फक्त पदे भरल्याने असुविधा दूर होतील का असा सवालही विचारला. मोठ्या रुग्णालयांचा भार कमी करण्यासाठी मॅटर्निटी होम उपलब्ध करण्यात आली आहेत. मात्र अशा स्थितीमुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते, मग भार कमी कसा होणार असा सवाल प्रशासनाला विचारला. ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये नवजात बाळाला ठेवण्यासाठी अतिदक्षता विभाग (एनआय सीयू) ची सुविधा नसल्याने जन्मलेल्या बाळाला कूपरमध्य़े शिफ्ट करावे लागते. रावली कॅम्प मॅटर्निटी होममध्ये सोनोग्राफी मशिन नाही तसेच मालवणी मॅटर्निटी होमध्येही असुविधा कायम आहेत. पालिकेच्या इतर मॅटर्निटी होममध्येही अशा प्रकारच्या असुविधांना सामोरे जावे लागते. याकडे नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पालिकेची एकूण किती मॅटर्निटी होम आहेत, किती चालू स्थितीत व किती बंद पडण्याच्या मार्गावर आहेत व किती चांगल्या स्थितीत चालवली जातात याबाबतची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी पालिकेची एकूण 28 मॅटर्निटी होम असून सर्व चालू स्थितीत आहेत. असुविधांबाबत माहिती घेऊन सांगितले जाईल असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. मॅटर्निटी होमबाबतच्या नगरसेवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन त्या दूर कराव्यात अशा सूचना स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाला केल्या.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget