मुंबईचा विकास आराखडा मंजूरीसाठी शिवसेना सरसावली पुढे

19 मे पूर्वी आराखडा करणार मंजूर 
मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या मुंबापुरीत दिड कोटी जनता राहत आहे या मुंबईचा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी शिवसेना आता पुढे सरसावली असून त्याचे सादरीकरण नुकतेच महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर झाले. या विकास आराखड्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी दिली.

आता नुकत्यपाच पार पडलेल्या मुंबई पालिका निवडणुकीच्या आचार संहितेत मुंबईचा विकास आराखडा अडकला होता.निवडणुकीनंतर आणि  या आराखड्याला मंजूरी देण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे शुक्रवारी महापौर बंगल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले यावेळी महापौर महाडेश्‍वर, शिवसेनेचे नेते अनिल परब, पालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगररचना तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू, पालिकेचे सभागृहनेते यशवंत जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समितीचे अध्यक्ष बाळा नर आदी उपस्थित होते.
मुंबईच्या विकास आराखड्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली असून हाआराखडा येत्या 19 मे च्या आत आराखडा मंजूर केला जाईल. त्यानंतर तो नगरविकास खात्याकडे पाठविला जाईल अशी माहिती महापौर महाडेश्‍वर यांनी दिली.

13 एप्रिलला नगरसेवकांना मिळणार प्रप्रशिक्षकाना आराखड्याचे प्रशिक्षण
मुंबईच्या विकास आराखड्याची माहिती व्हावी यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांना शिवसेनेने विकास आराखड्याचे प्रशिक्षण येत्या 13 एप्रिल रोजी नायर रुग्णालयातील सभागृहात देणार आहे. आपल्या विभागात कुठे आणि कसे आरक्षण पडले आहे तसेच आराखड्यातील तांत्रिक बाबी कशा समजावून घ्याव्यात या विषयी यावेळी माहिती दिली जाईल अशी माहिती महापौर महाडेश्‍वर यांनी दिली. या प्रशिक्षणात काही समजले नाही तर पालिका मुख्यालयात 6 व्या मजल्यावर या विभागात नगरसेवकांच्या शंकांचे निरसन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget