परळमध्ये सापडला ब्रिटीशकालीन मैलाचा दगड

पालिका या दगडाचे करणार जतन
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) –  -  मुंबईत परळमधील एस एस राव मार्गावर फुटपाथवरील अतिक्रमणे हटवताना पावणे दोनशे वर्षापूर्वीचा पालिकेला ब्रिटीशकालीन साडेचार फुट उंचीचा मैलाचा दगड सापडला. अतिक्रमण हटवण्याची मोहिम पालिकेच्या एफसाऊथ  विभागातर्फे सुरू आहे.  यावेळी हा मैलाचा दगड सापडला. हा दगड तेथेच जतन केला जाणार असल्याची माहिती उपायुक्त विश्वास मोटे यांनी दिली.
           
मुंबई महापालिकेची फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम जोरदार सुरू आहे. शुक्रवारी परळ मध्ये कारवाई करण्यात आली. यावेळी येथील फुटपाथवरील 18 स्टॉल, 20 झोपड्यांवर पालिकेने कारवाई केली. ही कारवाई सुरू असताना जमिनीत साडेचार फुट उंची मैलाचा दगड सापडला. 1838 सालचा हा मैलाचा दगड असून मुंबईत कुलाब्यापासून माहिमपर्यंत एकूण 17 ब्रिटीशकालीन मैलाचे दगड आहेत. त्यापैकी बरेच दगड हे गायब आहेत. परळमधील हा मैलाचा दगड पाच क्रमांकाचा असून महापालिकेने या दगडाचे जतन करण्याचा निर्णय़ घेतला आहे. परळमध्ये असे दोन दगड असून त्यातील एक दगड चित्रा सिनेमागृहासमोर आहे. ब्रिटिशांनी असे 17 मैलाचे दगड मुंबई बेटावर 1837 च्या दरम्यान ठेवले. यातील काळा घोडा येथील सेंट थॅामस चर्च जवळ एक आहे. परळमधील सापडलेला हा दगड पाचव्या क्रमांकांचा आहे. ब्रिटीशांनी क्रमांकानुसार हे दगड ठेवले आहेत. कुलाबा ते माहिमपर्यंत अशा प्रकारचे मैलाचे दगड असून शेवटचा दगड माहिम कॉजवे व सायन किल्ला येथे आहे, अशी माहिती मोटे यांनी दिली. 

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget