मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबई महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यात कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याना थकबाकी न देता नोकरीवरून काढण्यात आले. याबाबत पालिका प्रशासनाला जाब विचारायला आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याना प्रशासनाने भेट न दिल्याने घन कचरा विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांच्या कार्यालयात फ़ासी लावून घेण्याचा प्रयत्न केला.
सफाई कर्मचाऱ्याना कायमस्वरूपी नोकरी द्यावी व थकबाकी द्यावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने निर्देश दिल्या नंतरही पालिकेने 150 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याना नोकरीवरुन काढले आहे. नोकरीवरुन काढताना प्रत्तेक कर्मचाऱ्याला 1 लाख 32 हजार इतकी थकबाकी पालिकेने दिलेली नाही. नोकरी गेल्याने व थकबाकी मिळत नसल्याने या कंत्राटी कर्मचार्यांची उपासमार होऊ लागली होती.
याबाबत कंत्राटी कर्मचारी आपल्याला न्याय मिळावा म्हणून पालिका आयुक्तांना भेटायला आले होते. आयुक्तांनी या कर्मचार्याना अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे पाठवले देशमुख यांनी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांच्याकडे भेटीला पाठवले. परंतू बालामवार यांनी या कर्मचाऱ्याना भेटण्यास नकार दिल्याने परमेश्वरी गणेशन या महिला कर्मचारीने नैराश्यातून फाशी लावून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.परमेश्वरी गणेशन याना वेळीच त्यांच्या सोबत असलेल्या इतर कर्मचारी व श्रमिक कचरा वाहतुक संघटनेचे मिलिंद रानडे यांनी अडवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.

Post a Comment