रे रोड येथे भीषण आग, 20 झोपड्या जळून खाक

सिलेंडरमुळे आग लागल्याचा संशयमुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबईत आगी लागण्याच्या घटना अजून थांबले ले नाही त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रे रोड येथील दारुखाना परिसरातील लकडीबंदर येथे गुरुवारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे २० ते २५ झोपड्या जळून खाक झाल्या. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

रेल्वे रोड येथील लकडी बंदर येथील दाटीवाटीने वसलेल्या झोपड्यांना दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रोद्र रुप धारण करुन परिसरातील झोपड्यांना वेढले. स्थानिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. आगीचा दाह प्रचंड असल्याने ती पसरत गेली. दरम्यान, यांत चार ते पाच सिलेंडरचा स्फोट झाला. आगडोंब उसळल्याने लोकांची पळापळ झाली. हाहाकार माजला. या घटनेची माहिती मिळताच ५ फायर इंजीन, ४ जेटी व १ पाण्याचा टॅंकरसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. आगीचे स्वरुप पाहून १ वाजून १३ मिनिटांनी २ नंबरची वर्दी बोलवण्यात आली. अखेर अथक प्रयत्नानंतर दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी आग पूर्णतः विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवांनाना यश आले. सुमारे २० ते २५ झोपड्या आगीत खाक झाल्याचे पालिका अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. मात्र ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजले नाही. याबाबतची चौकशी सुरु आहे, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget