मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत महापालिका रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांची रिक्त पदे किती यांची माहिती सदस्यांनी मागितली होती. त्यानुसार मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणारी रुग्णालये व आरोग्य विभागाची कार्यालये यामध्ये १९४ संवर्गातील २९१५५ मंजूर पदांपैकी २३४३७ पदे भरण्यात आली असून तब्बल ५७१८ पदे रिक्त असल्याचा अहवाल नुकताच स्थायी समितीत सादर करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांनी ६ मे २०१७ ला दिलेल्या निर्देशानुसार उपायुक्त आरोग्य विभाग यांनी रिक्त पदांच्या अहवालानुसार स्थायी समितीला सादर केला आहे. या अहवालानुसार महापालिकेच्या सर्वात मोठ्या असलेल्या केईएम रुग्णालयात ५०३९ पदांपैकी १०८५, लोकमान्य टिळक शिव रुग्णालयातील ३७७४ पदांपैकी ९२०, नायर रुग्णालयांमधील ३४४३ पदांपैकी ७९४ पदे रिक्त आहेत. तसेच नव्याने सुरु केलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज मधील ४६१ पदांपैकी १५६, एनएचडीसी मधील २८६ पैकी ५०, चीफ मेडिकल सुप्रिडेंट कार्यालयातील ६३९३ पैकी १२९२, तर कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालयातील ९७३८ पैकी ५७१८ पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे.
५७१८ रिक्त पदांमध्ये प्रोफेसरची ११०, असोसिएट प्रोफेसरची १७०, असिस्टंट प्रोफेसरची ३०६, मेडिकल ऑफिसरची ९९, असिस्टंट मेडिकल ऑफिसरची ९३, रजिस्ट्रारची १६४, हाऊस ऑफिसरची २३३, होननरीची ११८, स्पेशिलिटी मेडिकल कन्स्लटंटन्टची १३१, क्लार्कची ३८९, सीसीटीची ९०, लॅब टेक्निशियनची १२७, एक्सरे असिस्टंटची ११२, लॅब असिस्टंटची १५२, फार्मासिस्टची ६४, परिचारिकांची २४३, 'वॉर्ड अटेंडंट'(बॉय)ची ५२0, स्विपरची ४५८, लेबररची १२७, हमालची १२८, आयांची १४६, ड्रेसररची १०८, लिफ्ट / वायर / पंप मॅनची ८५, लिफ्टमॅनची ५० यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त असल्याचे अहवालात नोंद आहे.
Post a Comment