पालिकेतील पहारेकरी सतॅक
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) पालिका प्रशासनाने रर-त्यांच्या कामांची निविदा पावसाच्या तोंडावर उशिराने काढल्याने रर-त्यांची कामे वेळेवर होणार नसून पावसाला लवकर सुरूवात झाल्यास दुरावस्थेत असलेल्या रस्त्यामुळे वाहतूकीचा बोजवारा मोठ्या प्रमाणात उडणार असून लोकांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे लागण्याची शक्यता आहे रस्त्यांच्या या कामावरून पालिका प्रशासन आणि शिवसेनेला खिंडीत पकडण्याची रणनीती भाजपाने आखली आहे पालिकेत पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम बजावण्याची संधी भाजपाला आता आयतीच चालून आली आहे ही संधी भाजपाने न सोडण्याचा विचार केला आहे त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप यांच्यात शीतयुद्ध पेटण्याची शक्यता आहेमुंबई हि देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत सुमारे दिड कोटी जनता राहत आहे या मुंबापुरीतील लोकांची संख्या वाढत तशी वाहनांची संख्या वाढत आहे या वाहनाना मुंबईतील रर-ते कमी पडत आहे असे असतानाच विविध प्राधिकरणानी रर-ते खोदले असून पालिकेने रर-त्यांच्या दुरुस्ती साठी ठिकठिकाणी रर-त्यांची कामे सुरू केली आहे त्यामुळे अगोदर लोक मोठय़ा प्रमाणात त्रस्त आहेत पूर्व आणि पश्चिम नगरातील तसेच शहर भागातील रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीने गेल्या महिन्यात मंजूरी मिळाली. शहर भागातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाला आता सुरूवात होणार आहे. रस्त्यांच्या कामांसाठी खडीचा तुटवडा भासला होता. त्यामुळे रस्त्यांची कामे रखडल्याची कबूली पालिका प्रशासनाने स्थायी समितीत दिली होती. त्यावर भाजपने आक्रमक भुमिका घेतली. खडी पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असून त्यांनी खडी कुठूनही आणावी, कारणे देवू नये अशी भुमिका घेत भाजपने प्रशासनाला आणि शिवसेनेची कोंडी केली होती. 30 मे पर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. मात्र कामासाठी कंत्राटदार नेमणे आणि खडीचा तुटवडा यामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. हवामान खात्याने पावसाला लवकर सुरूवात होणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे मुंबईतील रस्त्यांची कामे पूर्ण होतील काय असा प्रश्न नगरसेवकांनाही पडला आहे.पालिकेने दिलेल्या देडलाईन या कालावधीत रर-त्यांची कामे पूर्ण होवू शकत नाही यंदाही लोकांना यांचा प्रचंड त्रास होणार आहे त्यामुळे पालिकेत पारदर्शकतेचे पाहरेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने आता शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखली असल्याचे समजते त्यामुळे रर-त्यांच्या कामामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध होण्याची शक्यता वतॅवली जात आहे
पावसाळ्यापूर्वी रर-त्यांची कामे पूर्ण करणे पालिकेची जबाबदारी - मुंबईकरांना दिलासा देयायचा असेल तर येत्या पावसाळ्यापूर्वी रर-त्यांची कामे झालीच पाहिजेत, अशी कडक भुमिका आता भाजप पक्षाने घेतली आहे.येत्या पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, त्यांनी ती कामे जबाबदारीने पूर्ण केलीच पाहिजे आम्ही पालिकेत पारदर्शकतेचे पाहरेकरी आहोत. आम्ही आमची भुमिका बराबर पार पाडू. आमच्या भुमिकेमुळेच खडीचा तुटवडा दूर झाला आहे. आम्ही आता सतर्क आहोत
भाजपा गटनेते - मनोज कोटक
Post a Comment