पालिकेतील नाट्य कलावंतांसाठी योग्य आर्थिक तरतूद करावी – उपमहापौर हेमांगी वरळीकर

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिका कामगार विभाग आयोजित आंतरविभागीय/खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेचा दर्जा उंच असून सातत्याने भरारी घेणारी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेतून महपालिकेतील कर्मचाऱयांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. महापालिकेचे अनेक कर्मचारी / कामगार या स्पर्धेतून मोठे कलाकार, नाटककार, दिग्दर्शक झाले आहेत. महापालिकेने अशा स्पर्धेत भाग घेणाऱया नाट्य, कलावंत मंडळांकरिता योग्य आर्थिक तरतूद करावी, असे निर्देश मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी प्रशासनाला दिले.

पालिका कामगार विभाग आयोजित ४६ वी आंतरविभागीय / खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा २०१६-१७ चा पारितोषिक वितरण समारंभ मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या हस्ते काल (दिनांक ९ मे २०१७) रात्री मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व) मुंबई येथे संपन्न झाला. या कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेनाट्य कलावंत, दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री हे उपस्थित होते. उपायुक्त (उद्याने व सुरक्षा) डॉ. किशोर क्षीरसागर, उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) राम धस, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे, प्रमुख कर्मचारी अधिकारी प्रभाकर वाघमारे तसेच महापालिकेचे विविध अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.उपमहापौर हेमांगी वरळीकर म्हणाल्या की, महापालिकेचे कामगार कामकाज, कर्तव्य सांभाळून आपली कला जोपासत आहेत. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नाट्यस्पर्धापेक्षा महापालिकेतर्फे आयोजित केलेली ही स्पर्धा निश्चितच दर्जेदार आहे. कर्मचारी कलावंतांनी घेतलेली मेहनत दाद द्यावी, अशी आहे. कर्मचाऱयांची ही कला अधिक कसदार होऊ शकते. या स्पर्धेकरिता केलेली तरतूद त्यामानाने कमी आहे, ती योग्य प्रमाणात करावी, असे निर्देश उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी दिले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget