गोपी टँक मार्केटसह पालिकेच्या ५ मंडयांचा होणार कायापालट

गाळेधारकांच्या व ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात येणार सुधारणा
मार्केटमध्ये लावणार 'एक्झॉस्ट पंखे' व 'हॉट एअर एक्स्ट्रॅक्टर्स'
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – पालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा पुरविणारी पालिका नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने मंडयांची सुविधादेखील देत असते. पालिका क्षेत्रात पालिकेच्या एकूण ९१ मंडया असून यापैकी ५ मंडयांमध्ये गाळेधारकांच्या व ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वैशिष्ट्यपूर्ण सुधारणा व आवश्यकतेनुसार पुनर्रचना करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये माहिमचे सुप्रसिद्ध गोपी टँक मार्केट, दादरच्या प्लाझा चित्रपट गृहाजवळील क्रांतीसिंह नाना पाटील मार्केट, नळ बाजार परिसरातील मिर्जा गालिब मार्केट आणि ग्रँट रोडचे लोकमान्य टिळक मार्केट यांचा समावेश आहे. या पाचही मंडयांमध्ये एकूण २ हजार ५९६ गाळेधारक आहेत, अशी माहिती पालिकेच्या बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कु-हाडे यांनी दिली आहे.

माहिम परिसरातील गोपी टँक मार्केटमध्ये एकूण ४७२ गाळेधारक असून दादरच्या क्रांतीसिंह नाना पाटील मार्केटमध्ये ३२३ गाळेधारक आहेत. या दोन्ही मार्केटमध्ये दुरुस्ती, पुनर्रचना व सुधारणा करण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने या मार्केटचे सध्या कमी उंचीचे असणारे छत हे अधिक उंचीचे करण्यात येणार आहे. तसेच हे छत करताना या मार्केटमधील भाजी, फळे, मटन, मासळी इत्यादी उपविभागांचे वेगळेपण अबाधित राहिल याची काळजी घेतली जाणार आहे दादर पश्चिम परिसरात असणा-या स्वातंत्र्यवीर सावरकर मार्केटमध्ये ३८४ गाळेधारक आहेत. नळबाजार परिसरात असणा-या पालिकेचे मिर्जा गालिब मार्केटमध्ये ९०७ गाळेधारक आहेत. तर ग्रॅण्ट रोड परिसरातील लोकमान्य टिळक मार्केटमध्ये ५१० गाळेधारक आहेत. या तीनही मार्केटचे छत हे पालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले मार्केटच्या (क्रॉफर्ड मार्केट) धर्तीवर करण्यात येणार आहे
पाचही मार्केटमध्ये पुनर्रचना करताना हवा योग्यप्रकारे खेळती राहून गाळेधारकांसह ग्राहकांनी देखील सुखकर वाटावे यासाठी मार्केटमध्ये 'एक्झॉस्ट पंखे' तर छतामध्ये 'हॉट एअर एक्स्ट्रॅक्टर्स' गरजेनुसार आवश्यक तेवढे बसविले जाणार आहेत तसेच. पाचही मंडयांमध्ये सध्या असणारी विद्युत वितरण व्यवस्था पूर्णपणे बदलविण्यात येणार आहे. तसेच कुठेही लटकत्या वायरी व त्यांना लटकवलेले हलते दिवे इत्यादी असणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर परिणामकारक विद्युत व्यवस्थेकरिता अत्याधुनिक पद्धतीची साधन सामुग्री परिणामकारकपणे वापरली जाणार आहे.या मंडयांमध्ये असणा-या उपविभागांच्या गरजेनुरुप फरश्या बसविल्या जाणार आहेत. तसेच ग्राहकांचे आवागमन अधिक सुविधाजनक व्हावे, यासाठी देखील आवश्यक ते बदल पुनर्रचनेदरम्यान केले जाणार आहेत. मार्केटमध्ये सुधारणा करताना मार्केटचे अंतर्गत व बाह्यस्वरुप हे पारंपारिकता व आकर्षकता जपणारे असेल याची काळजी घेण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने मार्केटचे प्रवेशद्वार हे आकर्षक असण्यासोबतच तात्काळ ओळखू येईल असे तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे. तर मार्केटच्या आतील भागात ओटले (ओटा), गाळेधाकरांचा सामान ठेवायची जागा इत्यादी बाबीं देखील पारंपारिक स्वरुपाच्या व एकसारख्या राहतील याची दक्षता घेतली जाणार असून
या मंडयांमध्ये सध्या असलेली शौचालये ही देखील गाळेधारकांच्या व नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सुधारित करण्यात येणार आहेत. तर काही ठिकाणी आवश्यकतेनुसार शौचालयांची पुनर्बांधणी केली जाणार आहे.या पाचही मार्केटचा कायापालट करण्यासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून लवकरच निविदा कार्यवाहीला सुरुवात होणार आहे, अशीही माहिती संजय कु-हाडे यांनी दिली आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget