मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेत नाले सफाईचा विषय चांगलाच गाजत असून हा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला आहे नालेसफाईची मुदत आज बुधवारी संपत आहे. आतापर्यंत 95 टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे यंदाचा पाऊस आता कोणत्याही क्षणी पडू शकतो असे असताना नालेसफाईची कामे मोठय़ा प्रमाणावर अपूर्ण आहेत कंत्राटदार नालेसफाईच्या कामाला चुना लावत आहेत. त्यामुळे मुंबई तुंबण्याचा धोका असून प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या आणि बनवाबनवीच्या विरोधात आज बुधवारी पालिका र-थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले विरोधकांनी पालिकेला चांगलेच धारेवर धरले य पालिकेच्या स्थायी समितीची बैठक एकमताने तहकूब करण्यात आली
मुंबई पालिकेत नाले सफाईचे बिगूल चांगलेच वाजत आहे कॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरूपम आणि पालिकेचे कॉंग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी काल सोमवारी मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्या पाहणीदरम्यान नालेसफाईचे विदारक वास्तव समोर आले. नालेसफाईची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. अनेक नाल्यांच्या सफाई कामाला सुरूवातही झालेली नाही. नाल्यांतून काढलेला गाळ नाल्यांच्या बाजूला काढून ठेवला आहे. तो उचलला जात नाही. कंत्राटदार कामचुकारपणा करीत आहेत. प्रशासनाचे त्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईचा बोजवारा उडण्याची दाट शक्यता आहे मुंबईत तुंबल्यास ओढवणाऱ्या आपत्कालिन नियंत्रण कक्ष कसा सामोरे जाणार आहे. त्यामुळे या कक्षाची पाहणी करण्यासाठी या कक्षाची पाहणी करण्यास गेलेल्या निरूपम यांना मज्जाव करण्यात आला. प्रशासनाच्या निष्क्रीय आणि उदासिन कारभाराच्या निषेधार्थ आज गटनेते रवी राजा यांनी आज स्थायी समितीत झटपट सभा तहकूबी मांडली होती. त्या सभा तहकूबीला शिवसेना आणि भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा देत सदस्यांनी आज नालेसफाईच्या दिरंगाईबाबत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ठपका ठेवला. आपत्कालिन नियंत्रण कक्षात जाण्याबाबत नियमावली ठरविण्याची मागणी करीत निरूपम यांना परवानगी नाकरणाऱ्या प्रशासनाचा रवी राजा यांनी निषेध केला. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी शंभर टक्के नालेसफाईच्या प्रशासनाच्या दाव्याबाबत असमाधान व्यक्त करीत शिवसेनेची अडचण केली
पालिका अतिरिक्त आयुक्तांनी नगरसेवकांना चांगलेच झापले
पालिका आपत्कालिन नियंत्रण कक्ष हा संवेदनशील कक्ष आहे. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय येवू नये यासाठी इतरांना प्रवेश दिला जात नाही. नगरसेवक त्या कक्षात जावू शकतात. मात्र इतर व्यक्तींना या कक्षात जायचे असल्यास त्यांना परवानगी शिवाय जाता येणार नाही अशा शब्दात पालिकेच्य अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी नगरसेवकांना झापले मात्र त्यावर कोणताहीनगरसेवकानी कोणतेही प्रत्युतर दिले नाही यावरून नगरसेवक पालिकेचे र-टटी असतानाही मुमुग गिळून गप्प बसले
आपत्कालिन कक्षात मॅच आणि मालिकाचे दर्शन
आपत्कालिन कक्ष हा संवेदनशील असल्याचे प्रशासनान म्हणत असताना कॉंग्रेसचे असिफ झकेरिया यांनी या कक्षात क्रिकेटचे सामने आणि मालिकांचे दर्शन होत असल्याची बाब समितीच्या निदर्शनास आणली. असे असेल तर या कक्षात जाण्यास मज्जाव का असा सवाल त्यांनी केला.
Post a Comment