मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या वृक्षप्राधिरणावर नामनिर्देशित नऊ सदस्यांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे. या नियुक्त्यांसाठी आता शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावण्यास सुरूवात झाली आहे पक्षाचे सदस्य आपल्याला मिळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची पाय-या झिजवत आहेत
सवाॅत मोठा अथॅसंकल्प असलेल्या पालिकेच्या वृक्षप्राधिरणावर 13 नगरसेवकांची नियुक्ती केली जाते. बाजार आणि उद्यान समितीचा अध्यक्ष हा पदसिध्द सदस्य असतो. पालिकेचे आयुक्त हे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. असे एकूण 15 सदस्य वृक्ष प्राधिरणावर असतात त्यांच्यासह आणखी नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधील नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. पालिकेच्या निवडणुकीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, किंवा ज्यांना पक्षात संधी मिळाली नाही, अशा कार्यकर्त्यांची वर्णी या पदांसाठी लागण्याची शक्यता आहे. तशा शिफारशी पक्षाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केल्या जातील. प्राधिकरणाच्या बैठकीत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्यांचा प्रस्ताव आता सादर होणार असून या नियुक्त्यांच्या प्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी जाहिरात दिली जाणार असून त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी उद्यान अधिक्षकांमार्फत होईल. त्यानंतर अंतिम अर्जांना पालिकेची मंजूरी मिळाल्यानंतर नियुक्त्या केल्या जातील मात्र याला अजून दोन तीन महिने लागणार आहेत,

Post a Comment