भायखळा येथील राणीबागेसह पेंग्विन दर्शनासाठी येणाऱ्या लोकांच्या खिश्याला लागणार आता चांगलीच कात्री

भाजपाच्या कडाडून विरोधानंतरही दरवाढीचा प्रस्ताव र-थायी समितीत मंजूर
शिवसेनेला यश तर कडाडून विरोध करणा-या भाजपाला अखेर अपयश
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – भायखळा येथील महत्वाच्या आणि सवाॅत जुने असलेल्या व गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेतच असलेल्या विरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विन पाहणे आता लोकांच्या खिश्याला चांगलीच कात्री लागणार आहे सकाळी मॉर्निंग वॉक आता सर्वसामान्यांना महाग होणार आहे.ही दरवाढ करण्यात आलेल्या प्रवेश शुल्कात फारसा कोणताही बदल न करता जैसे थे ठेवत शुक्रवारी पालिका स्थायी समितीत मंजुरी मिळवण्यास शिवसेनेला चांगलेच यश आले.भाजपाच्या विरोधाला न जुमानता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने प्रस्ताव मंजूर करून घेतला. याला जोरदार विरोध करीत भाजप व सपाने सभात्याग केला. या प्रस्तावाला पालिका सभागृहात अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शुल्कवाढीची अमलबजावणी होणार आहे होईल तोपर्यंत पेंग्विन दर्शन पाच रुपयात होणार आहे.

भायखळा येथील राणीबागेतील चार व्यक्तीच्या कुटुंबासाठीचे 100 रुपये शुल्कवाढ कायम ठेवण्यात आले असून कुटुंबासोबत येणारी पाचव्या व्यक्तीस किंवा सिंगल व्यक्तीला मात्र 100 रुपयांवरून 50 रुपये व 12 वर्षाच्या आतील मुलास 25 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. शिवाय मॉर्निंग वॉक साठी 150 रुपयाची शुल्कवाढ कायम ठेवली आहे
राणीच्या बागेतील पेंग्विन दालनाचे महिन्याला वीज बिल दहा लाख रुपये येत असून त्याच्या देखभालीसाठीही लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा करत प्रशासनाने राणीच्या बागेतील प्रवेश शुल्क पाच रुपयांवरुन 100 रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीत मंजूर झाल्यानंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी या दरवाढीला विरोध करण्यास सुरवात केली. शुक्रवारी स्थायी समितीत हा प्रस्ताव चर्चेला आला असता, मागील अनेक वर्षापासून शुल्कवाढ झालेले नाही, असे सांगत कुटुंबाठीचे 100 रुपये शुल्कवाढ कायम राहावे, सिंगल व्यक्तीला मात्र 100 वरून 50 करावे अशी उपसूचना सभागृहनेते यशवंत जाधव यांनी मांडली. मॉर्निंग वॉकसाठी 30 रुपयावरून तब्बल 150 रुपये करण्यात आलेले शुल्कवाढीबाबत काही न बोलता काय़म ठेवण्याची मागणी केली. ही शुल्कवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही, ती कमी करावी अशी मागणी करीत सभागृहनेत्यांच्या उपसूचनेला भाजप व सपाने विरोध केला. मात्र सभागृहाबाहेर विरोध करणा-या काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उपसूचनेला समर्थन केले. यावेळी भाजपने उपसूचना मांडत प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी केली असती तर ही शुल्कवाढ तूर्तास टाऴता आली असती, पण ती खेळी भाजपला खेळता न आल्याने जास्त चर्चा न करू देता बहुमताच्या जोरावर शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला.

अशी असणार दरवाढ
राणीबाग प्रवेश व पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क
- १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : १00 रुपये
- तीन ते १२ वयोगटांतील मुलांसाठी : २५ रुपये
- कुटुंबासाठी : दोन प्रौढ व तीन ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १00 रुपये
- सिंगल व्यक्तीसाठी तीन वर्षांवरील मुलांसाठी २५ रुपये व १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी 50 रुपये

शालेय विद्यार्थ्यांसाठी -
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : निशुल्क.
खासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : २५ रुपये.

-- सकाळी सहा ते आठपर्यंत मॉर्निंगवॉकसाठी : मासिक १५0 रुपये.
संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंद
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : निशुल्क
फोटोग्राफी पेंग्विन कक्ष वगळता : १00 रुपये
व्हिडीओ शूटिंग पेंग्विन कक्ष वगळता : ३00 रुपये
परदेशी पर्यटकांसाठी -
१२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४00 रुपये.
तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : २00 रुपये.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget