पालिकेच्या रुग्णालयांची सुरक्षा आता खाजगी सुरक्षा रक्षकांकडे

321 खासगी सुरक्षा रक्षक नेमणार
वर्षाला 11 कोटीचा येणार खर्च
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेची सुरक्षा पालिका सुरक्षा रक्षक करत आहे मात्र आता पालिकेने ही सुरक्षा खाजगी संस्थांना देण्याचा विचार केला आहे मुंबई पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर केईएम, लोकमान्य टिळक, नायर व कूपर या प्रमुख रुग्णालयात खासगी सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला आहे. सध्या असलेल्या सुरक्षेत येत्या मे नंतर अजून 321खासगी सुरक्षांची भरती करणार आहे तसा प्रस्ताव तयार करून पालिका प्रशासनाने र-थायी समितीच्या मंजुरी साठी सादर केला आहे

मुंबई महापालिकेची केईएम, लोकमान्य टिळक व नायर ही तीन प्रमुख रुग्णालये आहेत. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर या तिन्ही रुग्णालयांत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर येथील सुरक्षा रक्षक वाढवण्यात आल्यानंतर यात अजून येत्य़ा मे नंतर 300 सुरक्षा रक्षकांची वाढ केली जाणार आहे. सद्यस्थितीत केईएम रुग्णालयांत 31, नायर 28, लोकमान्य टिळक रुग्णालयांत 72 व आर एन कुपर रुग्णालयांत 23 असे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र मागील मार्चमध्ये नातेवाईकांकडून डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर तातडीने सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सुरक्षेत वाढ करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. त्यानुसार केईएम मध्ये 112, लोकमान्य टिळक रुग्णालयांत 104, नायर रुग्णालयांत 76 व आर. एन. कूपर रुग्णालयांत 29 खासगी सुरक्षा रक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यापूर्वी नियुक्त करण्यात आलेले 400 व आता 321 असे एकूण 721 सुरक्षा रक्षक तैनात होणार आहेत. महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी कॉर्पोरेशन यांचे सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहे. 1 मे नंतर नियुक्त करण्यात येणा-या 321 सुरक्षा यंत्रणेसाठी वर्षाला सुमारे 11 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.





Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget