मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिका ही देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिकेच्या महत्वाचे उत्पन्न देणाऱ्या जकात बंद होणार असून वर-तु सेवा कर एक जुलै पासून लागू होणार आहे जकात बंद झाल्यावर सरकारपुढे हात पसरायला लागू नये मुंबईतील जकाती बरोबरच इतर महानगर पालिकांचे स्थानिक कर रद्द झाल्यानंतरही त्यांची स्वायत्तता कायम ठेवावी.शहराच्या सुरक्षेसाठी जकात नाके तसेच ठेवावे अशी भुमिका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मांडली आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून पालिकेला थेट भरपाई कशी मिळू शकेल या संदर्भात महापौर बंगल्यावर पालिका प्रशासनाने सादरीकरण दाखवले त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या लोकांना पालिका मुलभूत सेवा सुविधा पुरवत आहे ही सेवा सुविधा पुरवत असताना पालिकेचे महत्वाचे उत्पन्नाचे साधन जकात आहे या जकातीपोटी पालिका सेवासुविधा लोकांना देत आहे मात्र एक जुलै पासून जकात रद्द होणार आहे आणि वस्तु सेवा कर लागू होणार आहे ही सेवा सुरू झाल्यानंतर महापालिकांचा स्थानिक कर रद्द होणार आहे. मुंबईला जकातीमधून वर्षाला सात हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या उत्पन्नाला पालिकेला चांगलेच मुकावे लागणार असून त्या बदल्यात सरकारी अनुदानावर अवलंबून राहावे लागणार आहे. सरकारने वेळीच अनुदान न दिल्यास पालिकांचा बोजवारा चांगलाच उडू शकतो. त्यामुळे राज्य आणि केंद्राकडून कशा प्रकारे थेट अनुदान मिळवता येऊ शकते. याबाबत पालिका प्रशासनाकडून महापौर निवासस्थानी सादरीकरण केले असल्याचे समजते. या सादरीकरणाच्या आधारावरच शिवसेना जीएसटीचे विधेयक विधी मंडळात मंजूर करताना अनुदानाची मागणी करणार असल्याची शक्यता .शहराच्या प्रत्येक प्रवेशाजवळ जकात नाके असल्याने मुंबईत येणाऱ्या वाहानांवर वचक आहे. हे जकात नाके बंद झाल्यास शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे जकात नाके कायम ठेवावेत अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे पालिकेतील पहारेकरी शिवसेनेच्या प्रत्येक प्रस्तावात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परीस्थीतीत निवडणुकीपुर्वी नागरीकांना दिलेली आश्वासने पुर्ण करण्यासाठी शिवसेनेने आता पासूनच प्रयत्न सुरु केले आहे. ठाकरे यांनी महापौर निवासस्थानी स्वत: सर्व कामांचा आढावा घेतला. अर्थसंकल्पात शिवसेनेच्या वचननाम्यासाठी कशा प्रकारे तरतूद करण्यात आली.ती कामे कशी,कधी,केव्हा पुर्ण होणार याचा आढावा घेतला तसेच सध्या मुंबईत विविध साथीच्या आजारानी मोठ्या प्रमाणात डोकं वर काढले आहे राबाबतही उउध्दव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे या आजार गंभीर विषय घेऊन लक्ष टाकावे आणि या आजारातून मुंबईकरांना मुव-त करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर,सभागृह नेते यशवंत जाधव,स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर,आयुक्त अजोय मेहता तसेच अतिरीक्त आयुक्त आदी उपस्थीत होते.
Post a Comment