मिशन इंद्रधनुषमध्ये सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन

मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – बालकांमधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. लसीकरण न केल्याने किंवा अर्धवट लसीकरण केल्यामुळे बालके आजारी किंवा मुत्यूमुखी पडतात. तरीही अनेक कारणामुळे बालकांचे लसीकरण होत नसल्याचे समोर आल्याने मिशन इंद्रधनुष हि लसीकरणाची खास मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये ज्या बालकांना लसीकरण द्यायची राहूंन गेली आहे अश्या बालकांना लसीकरण केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

मिशन इंद्रधनुष मोहीम सन २०१४ पासून राबविबण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या मुलांचे लसीकरण राहून गेले आहे किंवा एखादा डोस देण्याचे राहून गेले असतील अश्या बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. प्लस पोलिओ कार्यक्रमा अंतर्गत आढळून आलेल्या अति जोखीमग्रस्त भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. या भागामध्ये लसीकरणापासून पूर्णतः व अंशतः वंचित असलेल्या मुलांचे जास्त प्रमाण आढळून आले आहे. अश्या भागांमध्ये विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येते. मे महिन्यात ७ मे ते १६ मे दरम्यान दुसऱ्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रातर्फे शहरी भागातील झोपडपट्टी, बांधकामे, अतिदुर्गम डोंगराळ भाग, लसीकरणाचे काम असणारे भाग इत्यादी ठिकाणी ५६४ विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रांचा लाभ घेवुन आपल्या बालकांच्या आरोग्याचे विविध आजारापासून संरक्षण करावे असे आवाहन केसकर यांनी केले आहे.

सन २०१५ मध्ये २३ हजार बालकांपैकी ४७ टक्के म्हणजे १० हजार ९०७ तर २०१६ मध्ये १७ हजार ८९९ बालकांपैकी ६७ टक्के म्हणजे १२३९ बालकांना तर सन २०१७ च्या एप्रिलमध्ये ९६२० बालकांचे उद्धिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी ६६ टक्के म्हणजे ६३५५ बालकांचे लसीकरण करण्यास महापालिकेला यश आले आहे. मुंबईमध्ये स्थलांतरित होणाऱ्या बालकांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे लसीकरण करताना अडचणी येतात. मुंबईमधील एफ उत्तर, पी उत्तर, एम पूर्व, एल आणि के पूर्व विभागात लसीकरण न केलेल्या बालकांचे प्रमाण जास्त असून या ठिकाणी विशेष लक्ष दिले जात असल्याची माहिती केसकर यांनी दिली.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget