मुंबईत पावसाळयात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढलेले असते. मात्र मुंबईत वाढत्या उकाड्यात स्वाईन फ्लू आजार पसरत असल्याचे महापालिकेच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. मुंबईत स्वाईन फ्लूचा मागील वर्षी मे महिन्यात एकच रुग्ण आढळला होता. यावर्षी मे महिन्याच्या १८ तारखेपर्यंत स्वाईन फ्लूच्या तब्बल १७ रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयात झाली आहे. जानेवारी २०१७ ते १८ मे २०१७ या कालावधीत स्वाईन फ्लूचे एकूण ३७ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ३ जणांचा मृत्यू मझाल्याचे अहवालात म्हटले आहे.
मुंबईमध्ये मागील वर्षी (२०१६) मे महिन्यात डेंग्यूचे २७ रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी मे महिन्याच्या १८ दिवसात १८ रुग्णांची नोंद झाली आहे. मलेरियाचे मागील वर्षी ४२३ रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी १८८ रुग्णांची नोंद झाली आहे. लेप्टोचे मागील वर्षी २ रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी ७ रुग्नाची नोंद झाली आहे. मागील वर्षी गॅस्ट्रोच्या ९२० रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी अद्याप ४६९ रुग्णांची नोंद झाली आहे. हेपेटायसिसच्या रुग्णांची मागील वर्षी १३५ रुग्णांची नोंद झाली होत्या यावर्षी आता पर्यंत ४४ रुग्णांची नोंद झाली आहे.
Post a Comment