शिवसेनेचा कातडी वाचवण्याचा प्रयत्न -
नालेसफाईवरून शिवसेना- भाजपमध्ये चांगलीच जुंपणार -मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेत सध्या नाले सफाईचा विषय चांगलाच गाजत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत नाले सफाईची जबाबदारी मुंबई महानगर पालिका प्रशासन, आयुक्तांची आहे. आयुक्तांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत केली जाते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबई तुंबल्यास मुख्यमंत्री, त्यांनंतर आयुक्त अजोय मेहता आणि सर्वात शेवटी पालिकेतील सत्ताधारी म्हणून शिवसेनेची जबाबदारी राहील. असे सांगत भाजपने नाले सफाईवरुन केलेल्या आरोपांना गुरुवारी शिवसेनेने प्रतिउत्तर देत नाले सफाईचा चेंडू थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टोलवून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे नालेसफाईवरून यंदाही शिवसेना - भाजपमध्ये जोरात जुंपण्याची शक्यता वतॅवली जात आहे
पालिकेने मुंबईतील नाले सफाईचे काम सुरू केले आहे या सफाई बाबत मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झाले आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा नाले सफाईचा पहाणी दौरा हा काळ्यायादीतील कंत्राटदारांना क्लिन चिट देण्यासाठी होता, असा आरोप बुधवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष ऍड.आशिष शेलार यांनी नाव न घेता केला होता. त्याला दुस-दुस-या दिवशी गुरुवारी शिवसेनेचे विधानपरीषदेचे गटनेते अॅड. अनिल परब यांनी प्रतिउत्तर दिले. नाले सफाईच्या कामाला शेलारांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्यांना सफाईत काही दोष दिसत असतील तर आरोप करण्या ऐवजी थेट मुख्यमंत्री किंवा आयुक्तांकडे तक्रार करावी. नागरिकांनी मोठ्या विश्वासनाने शिवसेनेकडे सत्ता सोपवली आहे. या जबाबदारीचे भान ठेवून शिवसेनेचे पक्षप्रमुख दरवर्षी पाहाणी करतात. प्रत्यक्षात नाले सफाईचे काम करुन घेण्याची जबाबदारी प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त अजोय मेहता यांची आहे. अजोय मेहता यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबई तुंबल्यास ती जबाबदारी सर्व प्रथम मुख्यमंत्री, त्यानंतर पालिका आयुक्त आणि त्यानंतर पालिकेतील सत्ताधारी म्हणून शिवसेनेची राहील असा टोला परब यांनी लगावत शिवसेनेने आपली जबाबदारी झुगारून नाले सफाईचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टोलवला आहे शिवसेनेने आपली जबाबदारी टाळत आहे . मुख्यमंत्र्यांनी एखाद्या प्रकल्पाची पाहाणी केली तर ते कंत्राटदारांना क्लिन चिट देतात का असा चिमटा काढून आपल्याला भेटल्या शिवाय कंत्राटदारांनी नाले सफाईची काम कसे सुरु केले अशी खंत भाजपला असावी, पालिकेतील पराभवाच्या नैराश्यातून शेलार यांनी हे आरोप केले आहेत असा टोलाही परब यांनी लगावला.
भाजपाची नौटंकी शिवसेनेचा आरोप
पालिकेने जे.कुमार या कंत्राटदाला काळ्यायादीत टाकले आहे. त्याच कंत्राटदाराला नागपूर पालिका रस्ते दुरुस्तीचे काम देते. तर, मुंबईतील मेट्रोचेही काम त्यांना कसे मिळाले ? याचे उत्तर सरकारने द्यायला हवे, अशी मागणीही परब यांनी केली. नाले सफाईवर आरोप करणे ही भाजपची नौटंकी आहे असाही आरोप त्यांनी केला.
Post a Comment