भाजपा गटनेता आणि मुंबई अध्यक्षांमध्ये समन्वय नसल्याचा शिवसेनेचा आरोप

जिजामाता उद्यानात प्रवेश शुल्क
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – भायखळा येथील जिजामाता उद्यानाच्या प्रवेश शुल्क वाढीवरून शिवसेना भाजपा मध्ये वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. पालिका प्रशासनाकडून आलेल्या शुल्कवाढीच्या प्रस्तावावर गटनेत्यांच्या बैठकीत भाजपा गटनेत्यांकडून मान्यता देत असतानाच त्यांचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या शुल्कवाढीच्या निर्णयाला विरोध करीत असल्याचे चित्र पाहता भाजपाच्या गटनेत्यांमध्ये आणि मुंबई अध्यक्षांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप पालिका सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केला आहे . 

जिजामाता उद्यानात पेंग्विन आल्यानंतर पर्यटकांचा ओढा वाढला आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हम्बोल्ट पेंग्विन पाहण्यासाठी शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत आणला होता , या प्रस्तावावर समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी आई वडिलांसह येणाऱ्या किंवा एका पालकांसह येणाऱ्या किंवा एका पालकांसह येणाऱ्या दोन मुलांना प्रवेश मोफत देऊन पालकांना १०० रुपये शुल्क आकारण्याची सूचना केली , यावेळी कोणत्याही गटनेत्याने हरकत घेतली नसल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. गटनेत्यांच्या बैठकीत भाजपा कडून वेगळी भूमिका मांडली जाते तर प्रसिद्धी माध्यमांसमोर वेगळी भूमिका मांडली जात असून भाजपाकडून केवळ राजकारण केले जात असल्याचा आरोप केला जात आहे जिजामाता उद्यानाच्या प्रवेश शुल्कावरून राजकारण करणाऱ्या भाजपाकडून सिलिंडर दरात वाढ , पेट्रोल दरात वाढ , रेल्वे तिकीट दरात वाढ ,पे टी एम साठी अतिरिक्त शुल्क इत्यादी करताना सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे यांची चिंता का नाही वाटत पालिकेत केवळ सत्ताधारी शिवसेनेला लक्ष करण्यासाठी भाजपाकडून जिजामाता उद्यानाच्या शुल्क वाढीचे राजकारण केले जात आहे असा आरोपही सभागृहनेते यशवंत जाधव यांनी शुक्रवारी पत्रकारांसमोर केला .

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget