मानधन वाढवून देण्याची मागणी
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात र-वच्छ अभियान मोहीम सुरू केली असून या मोहिमेवर करोडो रुपये खर्च केला जात आहे मुंबई पालिकाही या मोहिमेची अंमलबजावणी करत आहे मात्र या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रबोधन स्वच्छता अभियानांतर्गत झोपडपट्ट्यामध्ये राबविल्या जाणाऱ्या दत्तक वस्ती योजनेचा चांगलाच बोजवारा उडाला आहे.या योजनेतील काम करणाऱ्या कामगारांना तुटपुंजी मानधन मिळत आहे पोट भरेल ऐवढेही मानधन मिळत नसल्याने कामगारामध्ये संतापाची लाट उसळली
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत सुमारे दिड कोटी जनता राहत आहे या मुंबापुरीतील 65 टक्के झोपडपट्टी असून दररोज 8 ते 9 टन कचरा गोळा होत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात र-वच्छ भारत भारत अभियान सुरू सुरू केले आहे सवॅ राज्यात या मोहिमेची अंमलबजावणी केली जात आहे यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहे मात्र प्रबोधन र-वच्छता अंभिअभियानांतर्गत झोपडपट्ट्यामध्ये राबविल्या जाणाऱ्या दत्तक वर-ती योजनेचा चांगलाच बोजवारा उडाला आहे हे काम करणाऱ्या कामगारांना तुटपुंज्या मानधनावर समाधान मानावे लागत आहे जे मानधन मिळत आहे त्यातही कपात केली जात आहे त्यामुळे या कामगारामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे झोपडपट्ट्यांमध्ये 750 लोकसंख्येमागे एक कामगार असे दत्तक वस्ती योजनेच्या कामाचे सुत्र आहे. तुटपुजे मानधन त्यातही मानधनाला संस्था कात्री लावत असल्यामुळे कामगारांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे साफसफाईची कामे करण्यासाठी कामगार मिळत नाहीत. परिणामी दत्तक वस्ती योजनेचा बोजवारा उडाला आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे कचऱ्याची समस्या अधिकच गंभीर होवून रोगाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे दत्तक वस्ती योजनेसाठी कामगार मिळत नसल्याने नगरसेवकांच्या विकास कामांवर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याची कॉंग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कामगारांचे मानधन वाढवावे तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात कामगार वाढवावेत अशी मागणीही त्यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या कडे केली आहे मानधन कमी असल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी आहे. सहा हजार रुपये मानधनावर कामगार राबत आहेत. तेवढेही मानधन कामगारांच्या पदरी पडत नाही. ज्या संस्थांना कामे दिली त्या संस्था हे मानधनही कापत आहेत. त्यामुळे कामगारांची आर्थिक कुचंबणा आहे. हे मानधन वाढवावे आणि कामगारांना त्यांचा पुरेपुर मोबदला मिळावा अशी मागणीही कामगार करत आहे या कामगांच्या समर-यांकडे कोण लक्ष देत नसल्यामुळे कामगांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे आमचे मानधन वाढवून दयावे अशी मागणी कामगार करत आहेत
कामगारांवर पालिकेचे दुर्लक्ष
मुंबई पालिका ही देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणली जात असून सोन्याची अंडी देणारी पालिका आहे ही पालिका र-वच्छ अभियानावर करोडो रुपये खर्च करत आहे मात्र या कामगारांकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे या कामगारांना चांगले समाधानकारक मानधन मिळालेतर हे कामगार काम चांगले करतील आणि र-वच्छ मुंबई होईल याबाबत आपण या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून पालिका सभागृहात आपण लवकरच आवाज उठवणार आहे
काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे
Post a Comment