मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबईतील रर-त्यांची कामे पालिकेने सुरु केली आहेत मात्र या कामाला लागणारी खडी मिळत नसल्याने ही कामे एकदम धिम्या गतीने सुरू आहेत ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पालिका पूढे सरसावली असून जोरात धावपळ सुरू केली आहे वसई , पनवेल , उरण, पडघा वरून जार-त दराने खडी विकत घेऊन रर-त्यांची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मात्र या कमी वेळात रर-त्यांची कामे कशी पूर्ण करणार हा पेच सवाॅनसमोर निर्माण झाला आहे
सोन्याची अंडी देणा-या मुंबई पालिकेने पावसापूर्वीची 558 रस्त्यांची कामे सुरु केली आहेत. मात्र ठाणे जिल्हयातील दगडखाणी बंद झाल्याने रस्त्याची कामे रखडली आहेत. आतापर्यंत अवघ्या सुमारे 114 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित रस्त्यांवर खडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू असतानाच वसई, पनवेल, पडघा ते उरणवरून जास्त दराने खडी आणण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. खडी मिळू लागल्याने रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी रस्ते विभागाची धावपळ सुरू झाली असली तरी मोठ्या प्रमाणात कामे रखडलेली असल्याने पुढील 10 ते 12 दिवसांत पूर्ण करणे अशक्य आहे. कारण खडीचे दर, वाहतूक आदी बाबी पूर्ण कराव्या लागत असल्याने वेळ जात असल्याची स्थिती आहे. खडीचे वाढलेले दर व कंत्राटात जम बसवावा लागत असल्याने खडीच्या वाहतुकीला उशीर होत आहे. पण तरीही खडी मिळू लागल्याने रस्ते कामांना वेग आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असताना खोदलेल्या रस्त्यांची कामे पडून असल्याने मुंबईकर हैराण आहेत. ठप्प झालेला खडीचा पुरवठा हे रस्त्यांची काम थांबण्यामागचं महत्वाचं कारण आहे, असे म्हटले जाते आहे. सध्या जागोजागी जेसिबी, डंपर आणि बॅरिकेटस् उभे आहेत. काही ठिकाणी रस्ते बांधण्यासाठीची ही सगळी सामग्री खड़ी अभावी नुसतीच उभी आहेत उर्वरित रस्ते दुरुस्तीसाठी खडी कोण देणार यावरुनच राजकारण सुरु आहे. दरम्यान रस्ते दुरुस्तीसाठी शेकडो ठिकाणी खोदून ठेवलेले खड्डे, अपूर्ण रस्ते यातली पसरणाऱ्या धुळीच्या त्रासाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जातो आहे.खडी अभावी मुंबईतील स्त्यांची रखडलेली कामे येत्या 31 मे च्या आत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे. पालिकेला वसई, पनवेल, पडघा व उरणवरून जास्त दराने खडी विकत घ्यावी लागते आहे. खडीची वाहतूक सुरू झाली असली वाढलेले दर व त्यासंबंधित इतर बाबी पूर्ण करण्यासाठी वेळ जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठप्प असलेली कामे कमी वेळात कशी पूर्ण करणार हा पेच प्रशासनासमोर आहे रर-त्यांची कामे वेळेत पूर्ण होणार नसल्याने पालिका र-थायी समितीत आणि पालिका सभागृहात मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू झाले आहे त्याला आता पालिका काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

Post a Comment