रफीकनगर भागातील खाडी लगतच्या २२३ अनधिकृत झोपड्या निष्कासित

देवनार क्षेपणभूमीजवळील खाडी लगतच्या जागेवर झाले होते अतिक्रमण
१२१ पोलीसांच्या सहकार्याने महापालिकेची धडक कारवाई
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या 'एम पूर्व' विभागातील प्रभाग क्रमांक १३४ च्या परिसरात रफीकनगर व बाबानगर मधील खाडी लगतच्या मोकळ्या जागेवर २२३ झोपड्या अनधिकृतपणे उद्भवल्या होत्या. देवनार क्षेपणभूमीची संरक्षक भिंत व रफीकनगर स्मशानभूमीच्या दरम्यान असणा-या जागेवरील या २२३ झोपड्या सलग दोन दिवस करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान तोडण्यात आल्या आहेत. या कारवाईचे महत्त्व लक्षात घेता मुंबई पोलीस दलाच्या तब्बल १२१ पोलीस कर्मचा-यांचे सहकार्य घेण्यात आले होते अशी माहिती एम / पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.

पालिकेच्या परिमंडळ – ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार एम पूर्व विभागाद्वारे १५ व १६ मे रोजी करण्यात आलेल्या या धडक कारवाई दरम्यान खाडी लगतच्या मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या २२३ झोपड्या तोडण्यात आल्या आहेत. या कारवाईचे महत्त्व व आवश्यकता लक्षात घेता मुंबई पोलीस दलाच्या १२१ पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच या कारवाईसाठी पालिकेचे सुमारे ५० कामगार – कर्मचारी - अधिकारी सदर ठिकाणी कार्यरत होते. त्याचबरोबर २ जेसीबी व २ डंपर यासह इतर आवश्यकत वाहने व साधनसामुग्री या कारवाई दरम्यान वापरण्यात आली, अशीही माहिती किलजे यांनी दिली आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget