कंत्राटदारांच्या कामगिरीचा इतिहास आता 'सिंगल क्लिक'वर उपलब्ध
कामगिरी अहवाल 'अपलोड' झाल्याशिवाय देयक अदायगी नाही !
कंत्राटदार कामगिरी अहवाल ३१ मे पासून संगणकीय प्रणालीत जोडणे बंधनकारक
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेची विविध नागरी सेवा सुविधा विषयक कार्ये निविदा पद्धतीने कंत्राटदारांकडून करवून घेतली जात असून यानुसार कंत्राटदारांनी केलेल्या कामांच्या गुणवत्तेचा अहवाल संबंधित खात्यामार्फत वेळोवेळी तयार केला जात आहे मात्र आता हा अहवाल त्या-त्या खात्याच्या स्तरावरच जतन केला जात असल्याने कंत्राटदाराने एका खात्यात केलेल्या कामांच्या गुणवत्तेची माहिती इतर खात्यांना होत नसल्यामुळे एखाद्या खात्याचे काम निकृष्ट दर्जाचे करुनही सदर कंत्राटदाराला दुस-या खात्याचे काम दिले जाण्याची शक्यता असल्याने कंत्राटदार माहिती व निविदा प्रक्रियेतील ही उणीव लक्षात घेऊन सर्व कंत्राटदारांच्या कामांचे अहवाल त्यांच्या 'युआयडी' क्रमांकाशी संगणकीय प्रणालीमध्ये जोडण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. ही माहिती अद्ययावत झाल्याशिवाय कंत्राटदाराला त्याचे देयक मिळणार नाही, अशीही तरतूद यात करण्यात आली असल्याने आता कंत्राटदारांची खैर नाही कंत्राटदारांच्या कामांविषयीचे गुणवत्ता अहवाल कंत्राटदारांच्या 'युआयडी' क्रमांकाला येत्या ३१ मे पासून संगणकीय पद्धतीने जोडले जाणार आहेत.
महापालिकेच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीमध्ये प्रत्येक कंत्राटदाराच्या 'युआयडी'ला आतापर्यंत केवळ कामाचा आदेश क्रमांक आणि कंत्राट-कामाचे मूल्य एवढीच माहिती उपलब्ध होती त्याचबरोबर कंत्राटदारांद्वारे केल्या जाणा-या कामांचा गुणवत्ता अहवाल हा यापूर्वी केवळ संबंधित विभागाच्या स्तरावरच जतन केला जात होता यामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामांच्या गुणवत्तेचा अहवाल इतर खात्यांना सहजपणे उपलब्ध होत नव्हता तसेच असा अहवाल उपलब्ध करुन घ्यावयाचा झाल्यास यात मोठ्या प्रमाणात कालापव्यय होत असे.आता कंत्राटदारांची व संबंधित कामांची माहिती संगणकीय पद्धतीने अंतर्गत स्तरावर उपलब्ध करुन देण्याबाबत आमूलाग्र सुधारणा ३१ मे पासून लागू करावयाचे आदेश पालिका आयुक्तांनी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. या सुधारणांमध्ये प्रत्येक कंत्राटदाराद्वारे करण्यात येणा-या कामांची माहिती कंत्राटदाराच्या युआयडीला जोडण्यात येणार आहेत. यामध्ये कामाविषयीची संख्यात्मक व गुणात्मक माहिती याचा समावेश असणार आहे संख्यात्मक व गुणात्मक माहिती मध्ये प्रामुख्याने कंत्राटदाराची नोंदणी विषयक माहिती, कंत्राटाची कामांनुसार रक्कम, कामांच्या प्रगतीचा अहवाल, कामांचा गुणवत्ता अहवाल, अदा करण्यात आलेल्या रकमेची माहिती, दंड झाला असल्यास त्याविषयीची माहिती, कामचुकारपणा झाल्याबाबत किंवा निकृष्ट दर्जाच्या कामाची माहिती, कंत्राटदाराचा काळा यादीत समावेश झाला असल्यास त्याबाबतची माहिती इत्यादी माहिती उपलब्ध असणार आहे कंत्राटदाराविषयीची माहिती पालिकेच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीमध्ये वेळोवेळी अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ही माहिती जोपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये भरली जाणार नाही, तोपर्यंत कंत्राटदारांच्या संबंधित बिलाची रक्कम अदा होऊ शकणार नाही, अशा पद्धतीने ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
कंत्राटदाराने केलेल्या कामांची संख्यात्मक व गुणात्मक माहिती महापालिकेच्या संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध करुन दिल्यामुळे एखाद्या अधिका-याची वा अभियंत्याची बदली किंवा निवृत्ती झाली; तर त्या जागेवर येणा-या नवीन व्यक्तीला संबंधित कामांची माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे कोणत्याही कंत्राटदाराला नवीन कंत्राट काम देताना संबंधित कंत्राटदाराच्या 'युआयडी'शी संलग्न असणारी माहिती तपासून व त्याची नोंद घेऊन निविदा विषयक कार्यवाही करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.पालिकेच्या अंतर्गत संगणकीय प्रणालीमध्ये प्रवेश करण्याची मुभा (SAP System Access) असणा-या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना कंत्राटदाराविषयीची व त्याने केलेल्या कामांविषयीची माहिती संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे. या सुधारणांमुळे कंत्राटदारांद्वारे करण्यात येणारी कामे आणि निविदा विषयक प्रशासकीय कामे ही अधिक जलद गतीने होण्यासोबतच गुणवत्ता, पारदर्शकता आणि अचूकता वाढण्यास मदत होणार आहे. कंत्राटदाराने केलेल्या कामाविषयीची माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्याची जबाबदारी ही सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर असणार आहे. तर याबाबत मान्यता देण्याची जबाबदारी ही संबंधित विभाग प्रमुखांची असणार आहे.
पालिकेच्या संगणकीय प्रणालीमध्ये कंत्राटदाराच्या युआयडीला कामांची संख्यात्मक व गुणात्मक माहिती जोडण्याबाबत व ही माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्याबाबत संबंधित अधिकारी , कर्मचा-यांना पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येणार आहे अशीही माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
यापूर्वीच लागू करण्यात आलेल्या संबंधित बाबींची संक्षिप्त माहिती:
पालिकेची निविदा प्रक्रिया अधिक गुणात्मक, अधिक स्पर्धात्मक व अधिकाधिक पारदर्शक व्हावी, यासाठी उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे यांच्या अध्यक्षतेत समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपल्या अहवालात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालिकेच्या निविदा पक्रियेत आमूलाग्र बदल यापूर्वीच करण्यात आले आहेत. हे बदल ऑक्टोबर २०१६ पासून अमलात आले आहेत पालिकेच्या कंत्राटदार नोंदणी प्रक्रियेत देखील आमूलाग्र बदल करण्यात येऊन ते देखील वर्ष २०१६ मध्येच लागू करण्यात आले आहेत. कंत्राटदारांना त्यांची ठेव रक्कम ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुलभता देखील यापूर्वीच लागू करण्यात आली आहे.
Post a Comment