मान्सूनपूर्व पावसात मुंबईत 14 ठिकाणी पाणी साचले

पालिकेचा दावा फोल
22 ठिकाणी झाडांची पडझड तर 7 ठिकाणी शॉर्टसर्किट -
मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – मुंबईतील नालेसफाई चांगली झाली असल्याने मुंबईत पावसाळयात पाणी साचणार नाही असा दावा पालिका प्रशासनाने केला असतानाच मुंबईत पहिल्याच पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे तब्बल 14 ठिकाणी पाणी साचल्याने पालिका प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला आहे अजून पावसाला तशी सुरूवात नसताना अशी परिस्थिती निर्माण झाली तर मुसळधार पाऊस कोसळल्यास मुंबईची काय परिस्थिती होईल हे यावरून पष्ट होत आहे यंदाही पालिकेचे कोटयावधी रुपये पाण्यात जाणार का असा सवाल आता पुढे येत आहे

मुंबईतील नाल्यांच्या सफाईविषयी सत्तारूढ शिवसेना वगळता अन्य पक्षांचे नगरसेवक पालिकेच्या नावे खडे फोडत असताना सुद्धा यंदा नालेसफाईचे काम चांगले झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे मात्र पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने पालिकेची झोप उडवली मुंबईतील तब्बल 14 ठिकाणी पाणी साचले जर मुसळधार पाऊस पडला असता तर यावरून मुंबई तुंबली असती यावरून पष्ट होत आहे मुंबईत कुलाबा येथे 24 मिलीमीटर तर सांताक्रूझ येथे 26.6 मिलीमीटर अशी एकूण 50 .6 पावसाची नोंद झाली आहे तर यावषीॅ आतापर्यंत 120 . 3 पावसाची नोंद झाली आहे. या पावसात पूर्व उपनगरातील गोवंडी, विक्रोळी कन्नमवार नगर, पार्कसाईट, तुंगा गाव पवई, घाटकोपर बर्वेनगर या पाच तर पश्चिम उपनगरातील जोगेश्वरीतील सुभाषनगर, मालाड येथील डिमॉन्टी लेन, मालवणी, येडू पटेल कंपाऊंड, जरीमरी कॉटेज, अंधेरीतील पारसीवाडा, जेव्हीएलआर, दहिसरमधील आंनद प्लाझा, बोरीवलीतील श्रीकृष्ण नगर अशा एकूण 14 ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता तर 22 ठिकाणी झाडे पडली यामध्ये शहरात 8 , पूर्व उपनगरात 7 , आणि पश्चिम उपनगरात 7 अशी झाडे पडली तर 7 ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या यामध्ये शहरात 2 , पूर्व उपनगरात 1 आणि पश्चिम उपनगरात 4 अशा घटना घडल्या पावसाला सुरुवात होताच मुंबईत पडझड होण्यास सुरुवात झाली आहे मात्र या पडझडीत कोणतीही जीवितहानी व जखमी झालेला नाही

तलाव क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्दप्पटीने पाणीमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये पावसाने सुरुवातीलाच हजेरी लावली आहे आतापर्यंत मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा या सातही तलावात 554 .80 मि .मी. पावसाची नोंद झाली आहे तर 24 तासात 145 .40 मि. मी.पावसाची नोंद झाली आहे गेल्यावर्षी याच कालावधीत या सातही तलावात 24 लाख 20 हजार 327 तर यंदा याच कालावधीत 4 लाख 29 हजार 699 दक्षलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्दप्पटीने पाणी साठा उपलब्ध आहे त्यामुळे मुंबईकरांना यंदा घाबरण्याची आवश्यकता नाही पालिकेच्या आकडेवारीवरून पष्ट होत आहे आतापर्यंत तानसा 109 . 60 , मोडक सागर 70 .00 , विहार 115 .00 , तुळशी 13 .20 , भातसा 160 .00 आणि मध्य वैतरणा 87 .00 मि . मी .तर गेल्या 24 तासात तानसा 2. 00 , मोडक सागर 8 . 40 , विहार 79 .80 , तुळशी 10 .00 , भातसा 41 .00 आणि मध्य वैतरणा 4 . 20 मि . मी . पावसाची नोंद झाली आहे

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget