नोट बंदीमुळे पालिकेला 15 लाखाचा फटका

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – केंद्र सरकारने काळे धन बाहेर काढण्यासाठी चलनातील 1000 व 500 रुपयांच्या नोटांचा वापरावर बंदी घातली घातली मात्र सदर नोटांचा वापर करून मालमत्ता कर भरण्याबाबत मुंबई पालिकेने एक खाजगी कंपनी नेमून त्यांच्याव्दारे करदात्याना मोबाईलवर एसएमएस व्दारे मेसेज पाठले सुमारे दीड कोटी नागरिकांना मोबाईलवरून एसएमएस पाठवून त्यासाठी कंपनीला प्रत्येक एसएमएससाठी 85 पैसे असे 15 .63 लाख रुपये खर्च करावा लागला आहे तसा प्रस्ताव शुक्रवारी पालिका स्थायी समितीत मंजूर करण्यात आला नोट बंदीमुळे पालिकेला हा फटका बसला आहे

मुंबई पालिका ही देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणली जात असून सोन्याची अंडी देणारी कोंबडी मानली जात आहे पालिका ही कोट्यावधी रुपयात चालणारी पालिका आहे केंद्र सरकारने लागू केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 मध्ये घेतला. या नोटबंदीनंतर राज्य सरकारच्या अर्थ विभागाने पालिका आणि नगरपालिकांना विविध करांच्या भरणा तसेच थकबाकी भरण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा भरण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याच्या मालमत्ताधारकांना चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांचा वापर करून मालमत्ता कराची थकीत भरण्याकरता येईल, असे एसएमएसद्वारे सर्व मालमत्ताधारकांना कळवले होते. त्यासाठी मे. एम. गेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला एसएमएस पाठवण्याचे काम दिले. या कंपनीला प्रत्येक एसएमएससाठी 85 पैसे सांगून काम मिळवल्यानंतर या कंपनीने 1 कोटी 59 लाख 98 हजार 786 एसएमएस पाठवल्याचे बिल पाठवल्यानंतर त्या कंपनीला 15 लाख 63 हजार 879 रुपये एवढ्या खर्चाचे पैसे आता पालिकेला दयावे लागणार आहे तसा प्रस्ताव पालिका प्रशासनाने शुक्रवारी पालिका स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला होता त्या प्रस्तावाला र-थायी मदतीने मंजुरी दिली आहे त्यामुळे पालिका प्रशासनाला नोट बंदीमुळे फटका बसला आहे 
 
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा कालावधी कमी असल्यामुळे निविदा न मागवता हे काम देण्यात होते मुंबईत मोबाईल फोनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांना आवाहन करण्याऐवजी सर्व प्रक्रीया एकाच कंपनीद्वारे राबवणे सोयीचे व्हावे यासाठी पालिकेने बल्क एसएमएस पाठवण्याचे काम मेसर्स एम गेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले होते

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget