पालिका आयुक्तांनी केले दराडे यांच्या कामाचे कौतुक !
मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – संजय दराडे हे प्रकल्प रस्त्यांची कामे व्यवस्थितपणे व्हावीत यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आपले सहकारी अभियंते, कर्मचारी, रस्त्याची कामे करणारे कंत्राटदार, वाहतूक पोलीस यांच्याशी अखंडपणे संवाद ठेवून रस्त्याची कामे व्यवस्थितपणे मार्गी लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा शब्दात दराडे यांच्या कामाचे कौतुक करुन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी त्यांना जून – २०१७ या महिन्याचे 'महिन्याचे मानकरी' 'ऑफीसर ऑफ द मंथ' जाहीर केले. पालिका मुख्यालयात आयोजित पालिका अधिका-यांच्या मासिक बैठकी दरम्यान पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) संजय दराडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्रीम. आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांच्यासह पालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment