मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या “पदवीधर सिनेट २०१७” निवडणुकीसाठी चा कालावधी हा सुमारे १ जुन ते ३० जून हा ठरविला आहे. परंतु हा कालावधी म्हणजेच जवळपास १ महिन्याचा आहे इतका कमी कालावधीत मतदार नोंदणी प्रक्रिया करणे जवळपास अशक्य आहे.मतदार नोदणी प्रक्रिया बद्दलची प्रसिद्धी आणि जागरुकता मोहीम विद्यापीठाच्या स्तरावर जवळपास चार महिन्यान पासून घेण्यात येणे गरजेचे होते परंतु विद्यापीठ कायदा अस्तित्वात नसल्याचे फुटकळ कारण देण्यात विद्यापीठ प्रशासनाने धन्यता मानलेली आहे ज्या प्रकारे विद्यापीठ कायदा १ मार्च २०१७ ह्या दिवशी महाराष्ट्रात लागू झाला परंतु परिनियम अजून पर्यंत उच्च व तंत्र विभागाने जारी केलेले नाहीत असे सांगण्यात आलेले होते अश्या प्रकारच्या सभ्रमित अवस्थेत निपक्ष निवडणूक घाईगडबडीत कशी काय घेणार ह्या बाबत पदवीधर मित्रांमध्ये चर्चा आहे अचानक १जुन२०१७ पासून नोंदणी प्रक्रिया सुरु करून गोंधळात भर टाकला आहे,असे अॅड.अमोल मातेले अध्यक्ष मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस यांनी सांगितले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या ५०० किमी चे अंतर( मुंबई , ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग) ७०० कॉलेज मधून शैक्षणिक वर्षाची सुरुवात लाखो विद्यार्थी करणारा आहे तो कालावधी सुद्धा जून पासून सुरु होत आहे ह्या मुळे लाखो विद्यार्थी, पालक , पदवीधर हे अनेक कारणास्तव ह्या कालावधीत प्रवेश कामा निमित्त अत्यंत व्यग्र असणार आहेत आणि विद्यापीठ प्रशासन सुद्धा ह्या कालावधीत अत्यंत व्यग्र असणार आहे. दरवर्षी कोणत्याही प्रकारची निवडणूक नसताना विद्यापीठ प्रशासनाची दमछाक होते तिथे निवडणूक प्रक्रिया सांभाळताना विद्यापीठ प्रशासन लाखो विद्यार्थांचे भवितव्य अंधारमय करेल अशीच भीती वाटत आहे,अशी अॅड.अमोल मातेले यांनी चिंता व्यक्त केली.त्यामुळे मतदार नोंदणी प्रक्रिया हि दोन महिन्यांनी वाढवावी आणि निवडणुका सप्टेंबर२०१७ च्या नंतर घ्याव्यात जेणे करून ह्या कालावधी दरम्यान बहुतेक शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी स्थिरस्थावर झालेले असतील आणि विद्यापीठ प्रशासनावर सुद्धा कोणताही भार नसेल.असा मातेले यांनी सांगितले पदवीधर सिनेट २०१७” हि निवडणूक पदवीधर विद्यार्थांतून प्रातिनिध निवडून देण्यासाठी असते ह्या जुन ह्या कालावधीत मुंबई,कोकणात शेतीची लागवडीची कामे जोर धरतात तसेच पाउसाच जोर अतिशय जास्त असतो, गणपती उत्सवाची लगबग असल्यामुळे लाखो मुंबईतील पदवीधर कोकणात गावी जातात त्यामुळे कोणतही निवडणुका सप्टेंबर पर्यंत घेऊ नये आणि मतदार नोंदणी प्रक्रिया चा कालावधी वाढवून देण्यात यावा जेणेकरून सामान्य सर्व पदवीधर मतदार बंधू व भगिनींना ह्यात सहभाग नोंदविता येणार आहे

Post a Comment