गोरेगाव येथील मेट्रो कारशेडचा प्रस्ताव सुधार समितीत नाॅट टेकन

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – गोरेगाव पूर्व येथील आरेच्या ठिकाणी मेट्रो- 3 चे कारशेड उभारण्या वरुन पालिका सुधार समितीत चांगलेच पडसाद उमटले शिवसेनेने आपली कडक विरोधकाची भूमिका कायम ठेवत बुधवारी भाजपला चांगलाच दणका दिला भाजपाला कोंडीत पकडत.भाजपच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत हा प्रस्ताव नाॅट टेकन केला हा प्रस्ताव नाॅट टेकन झाला असला तरी कारशेडच्या प्रकल्पावर फारसा परिणाम होणार नाही. राज्य सरकारच्या अख्यत्यारित प्रकल्प असल्याने शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता सरकारला या प्रकल्पाचे काम सुरू ठेवणे शक्य आहे. त्यामुळे आता मेट्रो कारशेडबाबत राज्य सरकार निर्णय़ घेणार असल्याने शिवसेनेच्या विरोधाला भाजप फारसे महत्व देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र येत्या काळात मेट्रोच्या कारशेडवरून शिवसेना - भाजपमध्ये वाद जुंपण्याची शक्यता वतॅवली जात आहे

गोरेगाव येथील मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे वसाहतीची जागा निश्चित केली आहे मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात कारशेडसाठी जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरेच्या एकूण जागेपैकी ३३ हेक्टर जागा मेट्रो कारशेड, वर्कशॉप, वाणिज्य सी १ वापरासाठी आरक्षित करा असा प्रस्ताव नगर विकास विभागाने महापालिकेकडे पाठवला आहे. नगर विकास विभागाने केलेल्या सूचने प्रमाणे महानगर पालिका प्रशासनाने आरे मधील आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीसमोर सादर करण्यात आला. यापूर्वीही हा प्रस्ताव सुधार समितीत आला होता. त्यावेळी शिवसेनेसह काँग्रेसने ही विरोध केला केला. येथे कारशेड उभारल्यास पर्यावरणाचा -हास होईल. त्यामुळे येथे कारशेड उभारण्याला सुमारे 13 हजाराहून अधिक लोकांनी विरोध दर्शवला आहे. जनतेचा विरोध डावलून येथे कारशेड उभारण्याचा निर्णय़ घेऊ नये, असा विरोध शिवसेनेसह काँग्रेसने केला होता. त्यामुळे यावर निर्णय़ झाला नव्हता. बुधवारी हा प्रस्ताव पुन्हा सुधार समितीत चर्चेला आला. तेव्हा शिवसेनेने आरेच्या कारशेडला पुन्हा विरोध केला. यावेळी भाजपचे नगरसेवक, प्रकाश गंगाधरे, ज्योती अळवणी यांनी बोलण्यासाठी हातवर केले. मात्र अध्यक्षांनी त्यांना बोलू न देता प्रस्ताव नाॅट टेकन केला. आरेच्या कारशेडचा प्रकल्प राज्य सरकारच्या अखत्यारित आहे, त्यामुळे तो पालिकेने नाॅट टेकन केला तरी त्याचा परिणाम प्रकल्पावर होणार नाही. राज्य सरकारला त्यावर निर्णय़ घेता येईल, हे माहिती असल्याने भाजपनेही हा विषय ताणला नाही. भाजप पुन्हा तीन महिन्यानंतर हा प्रस्ताव आणणार आहे. दरम्यान शिवसेना -भाजपमधल्या या वादात न पडता विरोधकांनी मात्र गप्प राहण्याची भूमिका घेतली होती मात्र हा प्रस्ताव आल्या नंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा वाद पेटण्याची शक्यता वतॅवली जात आहे

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget