मुंबईत शक्तिशाली 313 पंप पावसाचे पाणी उपसणार
रस्त्यांची ९० टक्के कामे पूर्ण अतिरिक्त आयुक्त देशमुख यांचा दावा
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –यंदाच्या पावसाळ्याच्या कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले असल्याचा दावा पालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला आहे हा दावा करताना मुंबईतील नाल्यांची सफाई चांगली झाली असून शहरात 73 , पूर्व विभागात 91 आणि पश्चिम उपनगर 86 टक्के झाली आहे तर मुंबईत पावसाचे पाणी तुंबूनये म्हणून 219 ठिकाणी 313 पाणी उपसणारे शक्तिशाली पंप बसवण्यात आले गेल्या वर्षी 293 पंप बसवण्यात आले असून रर-त्यांची 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत असेही देशमुख यांनी सांगितले
यंदाचा पाऊस तोंडावर आला आहे कोणत्याही क्षणी कोसळू शकतो असे असताना पालिकेने अजून योग्यरित्या नालेसफाईचे काम केलेले नाही अशी ओरड सत्ताधारी शिवसेना वगळता दोन्ही उपनगरांतील बरेच नगरसेवक आपापल्या विभागातील मोठ्या नाल्यांच्या सफाईबद्दल असमाधानी व्यक्त करत आहेत. भाजपने तर नालेसफाईबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली असताना नालेसफाई पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनुक्रमे ९१ आणि ८६ टक्के व शहर विभागात ७३ टक्के झाली असल्याची आकडेवारी प्रसारमाध्यमांना सादर केली. पूर्व उपनगरांतील नाल्यांमधून ६१ हजार ४५४ मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित असून, त्यापैकी ९१.७६ टक्के, पश्चिम उपनगरे आणि शहर विभागातून अनुक्रमे एक लाख पाच हजार ४१२ मे. टन आणि २८ हजार ३०५ मे.टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट असून, त्यातून अनुक्रमे ८५.९० टक्के व ७३.६२ टक्के गाळ काढण्यात आला २५ मेपर्यंत मिठी नदीतून सर्वाधिक ९९.३९ टक्के गाळ शहर विभागातून, त्याखालोखाल पूर्व आणि पश्चिम उपनगरांतून अनुक्रमे ७५.८४ आणि २० टक्के गाळ काढण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. पावसाळ्याआधी मिठी नदीतून ९९ हजार ३४६ गाळ काढण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
पालिकेच्या ए विभागात 100 टक्के नाल्यांची सफाई
‘पालिका मुख्यालय असलेल्या ए विभागातील छोट्या नाल्यांची सफाई १०० टक्के झाल्याचा दावा केला गेला आहे रस्त्यांच्याकडील छोट्या नाल्यांतील गाळ काढण्याचे काम सुरु असून, २९मेपर्यंत शहर विभागातील ‘ए’ परिमंडळातून १०० टक्के नालेसफाई झाली, असा दावा प्रशासनाने केला आहे. उर्वरित सहा परिमंडळांतील छोट्या नाल्यांची सफाई पुढीलप्रमाणे : परिमंडळ दोन - ८२ टक्के, परिमंडळ तीन - ९२, परिमंडळ चार- ९४ टक्के, परिमंडळ पाच- ९५ टक्के, परिमंडळ सहा- ९४ टक्के आणि परिमंडळ सात मध्ये ९२ टक्के काम झाले आहे.
मुंबईतील पाणी तुंबणारी ६६ अतिसंवेदनशील ठिकाणे
यावर्षी मुंबापूरीत २७० ठिकाणी पाणी तुंबणार असून, त्यापैकी ६६ ठिकाणे अतिसंवेदनशील आहेत, असे रस्ते विभागाचे अतिरिक्त आयुक्त देशमुख म्हणाले. पाणी तुंबून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये तसेच लोकांचाही त्रास टळावा म्हणून २१९ ठिकाणी ३१३ ठिकाणी पाणी उपसणारे शक्तिशाली पंप बसवण्यात आले आहे. गेल्या वर्षी २९३ असे पंप बसवण्यात आले होते.
विभाग पाणी तुंबणारी ठिकाणे अतिसंवेदनशील ठिकाणे
शहर ४५ ३६
पूर्व उपनगरे १४० ८
प. उपनगरे ८५ २२
एकूण २७० ६६
पावसाळ्यात समुद्रात उसणार उंच लाटा ‘
शनिवार, २४ जुन- दुपारी १२.२० वा., ४.८९ मीटर उंच.
रविवार, २५ जुन- दुपारी १.०७ वा., ४.९७ मीटर उंच.
सोमवार, २६ जुन- दुपारी १.५४ वा., ४.९४ मीटर उंच.
सोमवार, २४ जुलै- दुपारी १२.५०वा., ४.८९ मीटर उंच.
मंगळवार, २५ जुलै- दुपारी ०१.३२ वा.,४.८७ मीटर उंच.
मंगळवार, २२ आॅगस्ट- दुपारी १२.२८ वा., ४.७५ मीटर उंच.
बुधवार, २० सप्टेंबर- दुपारी १२.०३ वा., ४.५४ मीटर उंच.
Post a Comment