घाटकोपर तानसा पाईप लाईनवरील डेब्रिज उचलण्याचे आदेश


मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत तानसा पाईप लाईन वरील झोपड्या तोडल्या आहेत. मात्र या तोडलेल्या झोपड्यांचे डेब्रिज महापालिकेने उचलले नसल्याने घाटकोपर पश्चिम येथील घरांचे नुकसान झाल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीची दखल घेत गेले कित्तेक दिवस पडून असलेले डेब्रिज लवकरात लवकर उचलण्याचे आदेश स्थानिक नगरसेवक व एन विभाग प्रभाग समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. 

मुंबई पालिकेने १७ मे रोजी घाटकोपर पश्चिम येथील वॉर्ड नंबर १२७ मधील कातोडी पाडा येथील आंबेडकर नगर रामनगर येथील बंद असलेल्या डाक लाईन वरील झोपड्या या तानसा पाईप लाईन वरील झोपड्या असल्याचे सांगत तोडल्या. १७ मे रोजी झोपड्या तोडण्यात आल्या असल्या तरी गेल्या २३ दिवसात या तोडलेल्या झोपड्यांचे रॅबिट मात्र पालिकेने उचललेले नाही. सदर विभाग हा डोंगराळ असल्याने पावसाचे सर्व पाणी डोग्रावरून मिळेल त्या मार्गाने खाली येथे. यामुळे या ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत. घाटकोपरमध्ये गेले दोन - तीन दिवस सतत रात्रीचा पाऊस पडत आहे. दोन दिवस पाऊस पडत असताना याठिकाणी पालिकेने पाडलेल्या झोपड्यांचे रॅबिट पाण्याबरोबर सतत खाली येऊन संरक्षण भिंती जवळ येऊन अडकले होते. शुक्रवारी रात्री १२ वाजता पावसाचे पाणी डोंगरावरून खाली येताना रॅबिटसह रामनगर येथील अष्टविनायक सोसायटी जवळील संरक्षण भीत तोडून खाली असलेल्या घरांवर कोसळले. यात ८ घरांमध्ये पाणी घुसले त्यात घाणीच्या पान्यामंउळे ४ घरांमधील वस्तूंचे नुकसान झाले असून एका घराला तडा गेला आहे. हा विभाग वॉर्ड क्रमांक १२३ व १२७ च्या मधोमध असल्याने याविभागात सफाईकाम व रॅबिट उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला होता.शनिवार रविवार दोन दिवस पालिकेला सुट्टी असल्याने सोमवारी घाटकोपर येथील एन विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील यांनी सहाय्यक आयुक्त डाँ.भाग्यश्री कापसे प्रभाग क्रं.123 च्या नगरसेविका स्नेहल ताई मोरे, सहा.अभियंता मंजुळ, धुमाळ, जाधव तसेच दुय्यम अभियंता आपटे, कनिष्ट अभियंता चव्हाण, शाखाप्रमुख संजय कदम, युवाशाखाधिकरी सुनील जोशी यांच्यासह अपघातग्रस्त विभागाची पाहणी केली व डेब्रिज लवकरात लवकर उचलण्याच्या सूचना व आदेश प्रशासनाला दिले आहेत.





Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget