फलटणच्या पिंपरद येथे एसटी आणि ट्रकची समोरा-समोर धडक; एसटीमधील 25 जण जखमी

फलटण- ट्रक व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पंचवीस जण जखमी झाले आहेत. हा अपघात फलटण-पंढरपूर मार्गावरील पिंपरद हद्दीत मंगळवारी सकाळी साडे अकराला झाला. यामध्ये चालकासह पाच जण गंभीर झाले. जखमींवर फलटणच्या खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड आगाराची विजापूर-पिंपरी चिंचवड एसटी (एमएच १४ बीटी ३१८२) पिंपरी चिंचवडकडे निघाली होती. त्याचवेळी फलटणकडून पंढरपूरकडे निघालेला ट्रक (एमएच २५ यु ११६६) पिंप्रद हद्दीत आला असता एसटी व ट्रक यांच्या जोरदार धडक झाली.
हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने चालकाच्या बाजूला धडकल्याने एसटी व ट्रक एकमेकांत घुसले. पुढील दहा फुटांपर्यंत बाजू फाटत गेली. यामध्ये दोन्ही चालक अडकले होते.

ग्रामस्थांनी तातडीन अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस व ग्रामस्थांनी चालक व प्रवाशांना बाहेर काढले. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून खासगी व सरकारी दवाखान्यात हलविले. या अपघातात पंचवीस जण जखमी झाले. त्यात एसटी चालक रवींद्र जाधव व ट्रक चालक शुभम रणपिसे हे गंभीर जखमी झाले.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget