अमित शाहांच्या मुलाच्या कंपनीला अच्छे दिन, संपत्तीत झाली 16 हजार पटींची वाढ, काँग्रेसचा सनसनाटी आरोप

नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शाह मुलाच्या कंपनीवरून वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. पुत्र जय शाह यांच्या कंपनीच्या उलाढालीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काँग्रेसनं अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे. तसेच या प्रकरणावरून काँग्रेसनं अमित शाह यांच्यासोबत नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.
2014चं सरकार बदलल्यानंतर अमित शाह यांच्या मुलाचंही नशीब फळफळलं आहे, असा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल यांच्या मते, अमित शाह यांच्या मुलाची कंपनी टेम्पल इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड मार्च 2013मध्ये तोट्यात होती. त्यावेळी कंपनीला 6,239 रुपयांचं नुकसान झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. तसेच मार्च 2014मध्येही कंपनीला 1724 रुपयांचा तोटा झाला होता. परंतु 2014-15नंतर कंपनीला मोठा फायदा झाल्याचं समोर आलं आहे. मे 2014नंतर कंपनीनं मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, त्या आर्थिक वर्षात कंपनीला 18,728 रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीचा एकूण महसूल फक्त 50 हजार रुपये होता. मात्र खरा बदल हा 2015-16नंतर घडला आहे. 2015-16च्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 80 कोटी झाली आहे. एका वर्षात कंपनीच्या उलाढालीत 16 हजार पटीनं वाढ झाली आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget