आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार त्रिपुरामध्ये भाजप आणि मित्रपक्ष 42 तर डावे 15 जागांवर आघाडीवर आहेत. तर नागालॅंडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना 30 तर एनपीएफला 22 जागांवर आघाडी आहे. मेघालयमध्ये मात्र काँग्रेस 23 एनडीए 21 जागांवर आघाडीवर आहे
ईशान्यकडील राज्यात अर्थात मेघालय, नागालँड आणि त्रिपुरात झालेल्या विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी सुरू असून आताच्या परिस्थितीनुसार त्रिपुरा , नागालॅंडमध्ये जवळपास भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता निश्चित झाली असून मेघालयमध्ये मात्र त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.तरीही काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येतो आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार त्रिपुरामध्ये भाजप आणि मित्रपक्ष 42 तर डावे 15 जागांवर आघाडीवर आहेत. तर नागालॅंडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना 30 तर एनपीएफला 22 जागांवर आघाडी आहे. मेघालयमध्ये मात्र काँग्रेस 23 एनडीए 21 जागांवर आघाडीवर आहे. एकंदर आता ईशान्य भारतातल्या 5 राज्यात आता भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. तर 56 जागांवर उमेदवार लढवूनही काँग्रेसला त्रिपुरात भोपळाही फोडता आलेला नाही.. माणिक सरकार यांची त्रिपुरातील भक्कम राजवट कोसळली आहे.एकेकाळी पश्चिम बंगास,त्रिपुरा आणि केरळ या तिन्ही राज्यात सत्ता असलेल्या डाव्यांची सत्ता आता फक्त दक्षिण भारतातील केरळपुरतीच मर्यादित राहिली आहे. तर भाजपच्या खात्यात देशातील 21 राज्य जमा झाली आहे.नागालॅंडमध्येही एनपीएफची सत्ता कोसळली आहे. मेघालयमध्ये काँग्रेसने गड राखला असला तरी त्यांच्या जागा मात्र कमी झाल्याचं दिसतं आहे.
त्रिपुरात 18 फेब्रुवारीला तर नागालँड आणि मेघालयात 27 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. वेगवेगळ्या एक्जिट पोलनुसार त्रिपुरा आणि नागालॅँडमध्ये भाजपला अच्छे दिन येण्याची चिन्ह होती. आता एक्झिट पोल्सच्या अंदाज बरोबर ठरले आहेत.
या निवडणुकीचा आता 2019च्या लोकसभेवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Post a Comment